मुकुटबन पोलिसांनी पाठलाग करून पकडली 10 पेट्या दारू

सुमारे 2 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त

0

सुशील ओझा, झरी: लॉकडाऊनमध्ये दारूविक्री बंद असल्याने दारुच्या अवैधरित्या वाहतुकीत वाढ झाली आहे. पोलिसांनी मुकुटबन-पाटण रोडवर एका कारमधून दारू तस्करी करणा-यांचा पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत देशी दारुच्या 10 पेट्या पोलिसांनी पकडल्या असून तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. सुमारे 2 लाख 45 लाखांचा मुद्देमाल या प्रकरणी जप्त करण्यात आला आहे.

गुरुवारी दिनांक 15 एप्रिलच्या रात्री पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान पाटण-मुकुटबन मुख्य मार्गाने मुकुटबनकडे एक सॅन्ट्रो (MH34 6994) या कारमधून दारूची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान रात्री या मार्गावरून सदर कार येताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी या कारला थांबवण्याचा प्रयत्न केला असता कार थांबली नाही. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून सदर कार पकडली.

गाडीची पाहणी केली असता यात दारूच्या 10 पेटी आढळून आल्या. पोलिसांनी कार पोलीस स्टेशनमध्ये जमा केली व दारूसाठा जप्त केला. या प्रकरणी देशी दारूच्या 480 नीप ज्याची किंमत 45 हजार व कार ज्याची किंमत 2 लाख असा 45 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी गाडी मालक प्रमोद भगत वय (43) चालक नितीन पाटील (21) दोघेही रा पुरड तालुका आहे. सदर कार्यवाही ठाणेदार धर्मा सोनुने, खुशाल सुरपाम ,पुरुषोत्तम घोडाम व संवणी तर दारू पुरवठा करणारा राहुल निमसटकर (33) रा .मांगली ता झरी या तिघांना अटक करून त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 ई अंतर्गत गुन्हा दाखल केला दीप बोरकर यांनी केली.

शासनाने 30 एप्रिल पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे बियरबार, देशी दारूचे दुकान व वाईनशॉप सर्व बंद आहे. मद्यपीना तालुक्यात कुठेही दारू मिळत नसल्याने तेलंगणातील दारुची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. दुचाकी व चारचाकीने दारुची आवक तालुक्यात वाढली असुन मद्यापीना दारू सहज उपल्ब्ध होत आहे.

वणी बहुगुणी हे देखील वाचा:

‘त्या’ दरोड्यातील मुख्य आरोपीला राजस्थान येथून अटक

लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

Leave A Reply

Your email address will not be published.