मुंगोली येथील ‘आशा क्लिनिक’ सुरु करण्याची मागणी
विदर्भातील पहिले 'आशा क्लिनिक' कर्मचारी व औषधांअभावी बंद
जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील मुंगोली गावात बंद अवस्थेत असलेले आशा क्लिनिक पुन्हा सुरु करण्याची मागणी गावातील आयुष रोहिदास ठाकरे यांनी केली आहे. तहसीलदार वणी व गट विकास अधिकारी वणी याना ईमेलद्वारे अर्ज पाठवून आयुष ठाकरे यांनी जिल्ह्यात नव्हे तर विदर्भातील पहिले आशा क्लिनिक परत सुरु करावे, अशी मागणी केली आहे.
ग्राम पंचायत मुंगोली व प्राथमिक आरोग्य केंद्र, कोलगाव यांच्या माध्यमातून दि. 19 फेब्रुवारी 2020 रोजी मुंगोली येथे ‘आशा क्लिनिक’ सुरु करण्यात आले. 14 वा वित्त आयोगाच्या निधीतून क्लिनिकसाठी औषधी व साहित्य खरेदी करण्यात आली होती.
त्यानंतर काही दिवस प्राथमिक आरोग्य केंद्र कोलगाव येथून औषधी पुरवठाही करण्यात आला. मात्र सध्या आशा क्लिनिक बंद असल्यामुळे मुंगोली येथील नागरिकांना लहानसहान आजारांसाठी वणी शहरात किंवा खाजगी डॉक्टरकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे मुंगोली येथील आशा क्लिनिक पूर्ववत सुरु करावे. अशी मागणी आयुष ठाकरे यांनी केली आहे.
हेदेखील वाचा
चिखलगाव रेल्वे गेट ते वरोरा रोड रेल्वे गेटपर्यंत सिमेंट रोड कामाला मंजुरी
हेदेखील वाचा
राज्यातील दिव्यांगांचे लसीकरण प्राधान्याने व्हावे- स्माईल फाउंडेशन
हेदेखील वाचा