मारेगाव तालुक्याला आज दिलासा…!

65 व्यक्तींनी केली कोरोनावर मात, केवळ 9 पॉजिटिव्ह

0

नागेश रायपुरे, मारेगाव: 17 में रोजी तालुक्यात केवळ 9 पॉझिटिव्ह आढळले. तर 65 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.रुग्णसंख्येचा दर कमी झाल्याने तालुक्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान तालुक्यात आज पाथरी येथील 65 वर्षीय एका व्यक्तीचा कोरोना मुळे उपचारादरम्यान मृत्यु झाला.

आरोग्य विभागाने 455 व्यक्तींची रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली. त्यात केवळ 9 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. तसेच आज 302 व्यक्तींची आरटीपीसीआर टेस्ट केली.  त्यांचे नमुने यवतमाळ येथे तपासणी करिता पाठवण्यात आले. तसेच 967 व्यक्तींचा आरटिपीसीआर रिपोर्ट पेंडिंग आहे.

तालुक्यातील एकाचा कोरोना मुळे मृत्यू झाला. यात पाथरी येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तालुक्यात सध्या 263 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यात कोविड सेंट वर 18 रुग्ण उपचार घेत आहे तर उर्वरित होम आयसोलेट आहे. काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. तालुक्यात एकीकडे रुग्णांची संख्या कमी होत आहे तर दुसरीकडे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तालुक्याला दिलासा मिळत आहे.

हेदेखील वाचा

एलसीबीची पथकाची धाड पुन्हा अपयशी, पथक आल्या पावली परतले

हेदेखील वाचा

अवैधरीत्या उपसा करून रेती नेणारे दोन ट्रॅक्टर जप्त

हेदेखील वाचा

सावधान: वणी तालुक्यात म्युकर मायकोसिसचा शिरकाव

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!