बोटोनी परिसरातील सोनू पोड येथे खून

विविध चर्चांना आले उधाण

0 1,144

जयप्रकाश वनकर, बोटोनी: येथून पाच किमी अंतरावर असलेल्या सराठी लगतच्या रस्त्यावर आढळला मृतदेह. सोनू पोड येथील वास्तव्यास असलेल्या तुकाराम आत्राम (४५) या इसमाचा मानेवर घाव घालून खून झाल्याचे दिसले. ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे विविध चर्चांना उधाण आले.

गंगाराम हा रात्री शेतावर जागलीस जातो असे सांगून घरून गेला. रात्री घरी परत नआल्याने घरच्या लोकांनी शेतात शोध घेतला असता शेताच्या बाजूला सदर इसमाचा मृत देह आढळला. लगेच मारेगाव येथील पोलिसांना माहिती देऊन सदर घटनेचा तपास सुरु करण्यात आला. गंगारामच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आल्याची शंका पोलिसांनी वर्तवली आहे. घरगुती शेतीच्या वादातून खून झाल्याची शंका व्यक्त करून मारेगाव येथील पोलिसाने एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

Comments
Loading...