गेल्या 5 वर्षातील वणी शहराचा विकास “भूतो न भविष्यती” ठरेल – हंसराज अहीर

नगराध्यक्ष व नगरसेवकांचा वणीत सत्कार

जितेंद्र कोठारी, वणी: आजपर्यंत वणी नगरपरिषदेला अनेक नगराध्यक्ष व नगरसेवक लाभले. मात्र मागील 5 वर्षात शहराचे ज्या वेगाने विकास झाला ते शहरासाठी “भूतो न भविष्यती” ठरणार आहे. असे गौरवोद्गार माजी खासदार व पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. ते वणी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या सत्कार समारंभात बोलत होते. शनिवारी वणीतील शिवाजी महाराज उद्यानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांची प्रमुख उपस्थिती होती.

वणी नगरपालिकेवर मागील 5 वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता होती. नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या नेतृत्वात नगरपालिका उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे व 22 नगरसेवकांनी विकासकामांसाठी सांघिक भूमिकेत राहून संधीचे सोने केले. वणी नगरपालिकेचा कार्यकाळ 1 जानेवारी 2022 रोजी संपुष्टात आला. या पाच वर्षांच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व नगरेवकांनी केलेल्या कामाचे कौतुक म्हणून शनिवार 8 जानेवारी रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी बोलतांना हंसराज अहीर म्हणाले पालिकेतील भाजपच्या सत्ताकाळात पिण्याचे पाणी, अनेक रस्ते, उद्यान, सांस्कृतिक सभागृह, पथदिवे, वाटर एटीएम, निर्गुडा नदी व सिंगाळा तलावाचा विकास, शहरातील प्रमुख रस्त्यांचे सिमेंटीकरण असे अनेक विकास कार्य करण्यात आले. यावेळी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनीही या ऐतिहासिक विकास कामांचा गौरवपूर्ण शब्दांमध्ये उल्लेख केला.

सत्कारमूर्ती नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे यांनी पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पूर्व केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, पूर्व पालकमंत्री मदन येरावार व आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे आभार मानून त्यांचे सहकार्य लाभल्याने शहराचा विकास शक्य झाल्याची नम्रपणे कबुली दिली.

केंद्रीय निधी, प्रधानमंत्री खनिज विकास निधी, सिएसआर फंड, वेकोलि व राज्य सरकार कडुन मिळालेल्या प्रचंड निधीमुळे विकास शक्य झाले तसेच नगरसेवकांच्या सहकार्यामुळे आणि एकसुत्रतेमुळे विकासाला योग्य न्याय देवू शकलो असे ही नगराध्यक्ष यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी नगरसेवकांचे व वणीकर जनतेचे आभार मानले.

सत्कार समारंभ कार्यक्रमात दिनकर पावडे, विजय पिदुरकर, संजय पिंपळशेंडे, गजानन विधाते, शंकर लालसरे, किशोर बावणे, बंडुभाऊ चांदेकर यांचेसह भाजपा भाजयुमो चे पदाधिकारी सर्व नगरसेवक व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

हे देखील वाचा: 

सावधान ‘शहेनशाह’ येतोय ! वेकोलि कर्मचा-यांनी घेतली धास्ती

शारीरिक संबंधाची लागली चटक, बळजबरी करताच झाली अटक

Comments are closed.