नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झालाच

वणीत सर्वत्र जल्लोष आणि स्वागत

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नागरिकत्व दुरुस्त कायदा लागू व्हावा म्हणून बऱ्याच काळापासून संघर्ष सुरू होता. अखेर सहा वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात सीएए देशभरात केंद्र सरकारने लागू केला. त्याचा जल्लोष राष्ट्र संवर्धन समिती तर्फे येथील शिवतीर्थावर केला.

दिनांक 11 डिसेंबर 2019 रोजी संसदेने या कायद्याला मंजुरी दिली. नंतर देशभरात या कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आलीत. त्यानंतर या कायद्याच्या समर्थनार्थ 2 जानेवारी 2020 ला वणी येथे राष्ट्रसंवर्धन समितीच्या आवाहनानुसार हजारो नागरिकांनी प्रचंड रॅली काढली होती.
त्याच राष्ट्रासंवर्धन समितीच्या सदस्यांनी दि.11 मार्चला संध्याकाळी राष्ट्रप्रेमी नागरिकांना एकत्र येऊन देशभक्तीपर घोषणा देत मोठा जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी केली.

या प्रसंगी राष्ट्र संवर्धन समितीचे प्रशांत भालेराव, विनोद मोहितकर, राजू पामपट्टीवार, अनुराग काठेड, प्रा.
झिलपीलवार , लक्ष्मण उरकुडे, कृष्णा पुरवार, विवेक पांडे, प्रशांत गुंडावार, चंदर फेरवानी, विजय पांडे, विकास बोढे, संदीप मदान, कवडू पिंपळकर, प्रमोद सप्रे, गोपाल मालधुरे, ओमप्रकाश पटेल, राजू तुराणकर, ललित लांजेवार, कल्याण पांडे व श्रीराम महाआरती मंडळाचे अनेक सदस्य उपस्थित होते.

Comments are closed.