जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना काळात भयग्रस्त जीवन जगताना गावक-यांच्या चेह-यावर नकलांच्या माध्यमातून हास्य फुलवण्यात आले. लोककलेच्या माध्यमातून गुदमरलेला श्वास मोकळा झाला असे प्रतिपादन सुप्रसिद्ध नकलाकार डॉ. दिलीप अलोणे यांनी व्यक्त केले. सध्या श्रीमती लक्ष्मीबाई राजगडकर कला महाविद्यालय, शिरपूर द्वारा चारगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनाचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी डॉ. दिलिप अलोणे व राम झीले यांच्या नकलांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ. दिलीप अलोणे बोलत होते.
कार्यक्रमात डॉ. दिलीप अलोणे व राम झीले यांनी विविध नकलाच्या माध्यामातून लोकरंजनासोबतच नागरिकांचे उद्भोदनही केले. नगलांचा कार्यक्रमाचा गावक-यांनी मनमुराद आनंद लुटला. यावेळी प्रा. ठमके यांनी कलावंताचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, सभापती संजय पिंपळशेंडे, दिनकर पावडे, विधाते, प्राचार्य आनंद वेले, सरपंच स्वप्ना नावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
चारगाव येथे रासेयोचे शिबिर
शिरपूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई राजगडकर कला महाविद्यालयाचे दिनांक 9 पासून चारगाव येथे रासेयोचे शिबिर सुरू झाले आहे. या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सचिव संकेत राजगडकर, शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड, डॉ. प्रवीण बोडखे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम ठमके यांनी केले. सूत्रसंचालक कुमारी प्रतिक्षा वरवाडे व उपस्थितांचे आभार हर्षा लेंगुळे हीने मानले. 15 मार्च रोजी शिबिराची सांगता होणार आहे.
कार्यक्रमाला स्वप्ना नावडे, यादव शिखरे, पूजा केळकर, प्रा. युगंधरा शिवणकर, सचिन नावडे, धनंजय आसुटकर, जी. एन. रामटेके, कु बोराडे, विद्या येरगुडे, सुनील मासिरकर, विकास बोदाडकर इत्यादींची उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वीतेसाठी एल. मजगवली, प्रा. कविता मोरे, जे. चव्हाण, बी. डी. कांबळे, संजय राठोड, अनिता चव्हाण यांच्यासह गावकरी व महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
हे देखील वाचा:
सुप्रसिद्ध मधूमेह व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रोहीत चोरडिया रविवारी वणीत
कोणता प्रभाग राहणार राखीव? कोणता प्रभाग सर्वात मोठा व सर्वात लहान?
वणीकरांचा मनसेला कौल… पण सर्व विरोधकांची एकी: वारे नगरपालिकेचे भाग 9
Comments are closed.