वणीत भाजपचे जोरदार निदर्शने, नोटीसची करण्यात आली होळी

देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या नोटीसबाबत भाजप आक्रमक

जितेंद्र कोठारी, वणी: फोन टॅपिंग प्रकरणात मुंबईतील सायबर पोलिसांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे. या विरोधात वणीत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. यावेळी महाविकास आघाडीविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रतिकात्मक नोटीसची होळी देखील केली.

देवेंद्र फडणवीस यांना नोटीस दिल्याच्या निषेधार्थ आज राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. वणीत देखील टिळक चौकात भाजपचे स्थानिक नेते, कार्यकर्ते एक आले व त्यांनी याचा निषेध केला. देवेंद्रजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, महाविकास आघडीकी तानाशाही नही चलेगी, नही चलेगी, महाविकास आघाडी मुर्दाबाद अशा घोषणाही देण्यात आल्या.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, जिल्हा महामंत्री (संघटन) राजू पडगिळवार, जिल्हा महामंत्री सतीश चव्हाण, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष, तारेंद्र बोर्डे, रवी बेलूरकर, संजय पिंपळशेंडे, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, विजय चोरडीया, बंडू चांदेकर, गजानन विधाते यांच्या सह शेकडो भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा:

वणीकरांचा मनसेला कौल… पण सर्व विरोधकांची एकी: वारे नगरपालिकेचे भाग 9

सुप्रसिद्ध मधूमेह व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रोहीत चोरडिया रविवारी वणीत

कोणता प्रभाग राहणार राखीव? कोणता प्रभाग सर्वात मोठा व सर्वात लहान?

Comments are closed.