टॉवर उभारणीच्या कामात शेतक-याचे दीड लाखांचे नुकसान

कंपनीच्या कर्मचा-यांचा मनमानी कारभार, कम्पाउंडच्या खांबांची मोडतोड, शेतीपयोगी वस्तूंची नासधुस

पुरुषोत्तम नवघरे, वणी: टॉवर उभारणीचे काम करताना रांगणा (भुरकी) शिवारातील एका शेतक-याचे मोठे नुकसान झाले आहे. कंपनीच्या कर्मचा-यांनी टॉवरचे काम करताना शेतातील कम्पाउंडचे सिमेन्टचे खांब तोडले तसेच शेतातील अनेक शेतीपयोगी वस्तूंची नासधुस केली, त्यांचे सुमारे 1.5 लाखांचे नुकसान झाले आहे. या शेतक-यांनी तहसीलदार व एसडीओ यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

Podar School 2025

नांदेपेरा येथील शेतकरी गणेश नानाजी रांगणकर यांची गावालगतच असलेल्या रांगणा-भुरकी शेतशिवारात शेती आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात इलेक्ट्रिक टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. या टॉवरसाठी 765 केव्हीच्या तार जोडण्याचे काम सूरू आहे. हे काम वरोरा येथील कर्नुल ट्रान्समिशन लिमिटेड या कंपनीद्वारा करण्यात येत आहे. मात्र हे काम करताना कंपनीचे कर्मचारी मनमानी कारभार करीत असल्याचे दिसत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तार जोडणीचे काम करताना कंपनीच्या कर्मचा-यांनी रांगणकर यांच्या शेतातील कंपाउंडचे सिमेंटचे खांब, बोअरवेल व त्यावरील ठिबक सिंचन, वीज मोटार पम्पची मोडतोड केली आहे. त्यामुळे रांगणकर यांचे सुमारे 1.5 लाखांचे नुकसान झाले आहे. 

आधीच पूर आणि अतीवृष्टीमुळे शेतकरी संकटात असताना तारांची जोडणी करणा-या कंपनीच्या कर्मचा-यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत रांगणकर यांनी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गामध्ये संताप व्यक्त होत आहे. 

हे देखील वाचा: 

स्पर्श क्लिनिक येथे त्वचारोगांविषयी अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध

Comments are closed.