मुख्य मार्गावरील झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

0

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी दुपारी 3 वाजता वणीतील मुख्य मार्गावरील महाराष्ट्र बँकेजवळील भव्य झाड कोसळले. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक जवळपास एक तासभर ठप्प झाली होती. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु झाडाजवळ आडोशाला उभी असलेली कारचे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी दुपारी वाराधुंद झाली. त्यामुळे कोंडावार  यांच्या दवाखाण्याजवळील जवळपास 35 फूट लांब मोठे झाड कोसळले. सदर झाड हे अनेक वर्षांपासून दवाखान्याजवळच्या मोकळ्या जागेत उभे होते. आता ते झाड जीर्ण झाल्याने कोसळले असल्याचे बोलल्या जात आहे. झाड कोसळल्याने त्या मार्गावरील  वाहतूक जवळपास एक तास ठप्प झाली होती.

वणीत त्या चौकात रामनावमीनिमित्त स्वागत द्वार उभारण्यात आले आहे. त्या स्वागत द्वारावर झाड कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. कारण झाड त्या स्वागत द्वाराला अडकले. जर स्वागत द्वाराला झाड अडकले नसते तर एखादी मोठी घटना ही घडू शकली असती.

या घटनेत त्या ठिकाणी सावलीचा आश्रय घेऊन उभ्या ठेवलेला कारचे मात्र थोडे नुकसान झाले आहे. घटनेनंतर त्वरित सहायक पोलिस निरीक्षक संग्राम ताटे आले. त्यांनी या घटनेची माहिती नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांना दिली. नगराध्यक्ष यांनी जे सि बी मशीन पाठवली.  झाडाला मशिनद्वारे अलगत उचलून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.