वणीत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

अनेक तरुणांचा पक्षप्रवेश, नवनिर्वाचित पदाधिका-यांना नियुक्तीपत्र

जब्बार चीनी, वणी: शहरातील जैताई मंदीर जवळ मंगळवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यक्रमात पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प. उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील (कामारकर) हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर जिल्हाध्यक्ष राहुल कानारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात वणी विभागातील युवकांनी पक्षात प्रवेश घेतला. तसेच या वेळी जिल्हा उपाध्यक्षपदी धीरज कुचनकर, तालुका अध्यक्षपदी हेमंत गावंडे, शहर अध्यक्ष पदी मनोज वाकटी यांची निवड करण्यात आली. त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पक्षाचे जिल्हा सरचिटणीस स्वप्निल धुर्वे यांनी केले. या वेळी वणी विभागातील प्रश्न मांडले. तसेच संघटनात्मक काम करताना वणीत तालुक्यात येणा-या अडचणींचा पाढा वाचला. येत्या काही दिवसातच नगर पालिका व जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. त्यामुळे पक्षाने पुरेपुर मदत करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब कामारकर म्हणारेल की पक्षा सोबत एकनिष्ठ असणा-या कार्यकर्त्यांवर अन्याय सहन करुन घेणार नाही. पक्षाची सत्ता जि.प. मध्ये आहे आणि राज्यात पण आहे. कुठले पण काम असले तर वणी विभागातील लोकांना प्राधान्य देण्यात येणार, कार्यकर्त्यांनी जिद्दीने सभासद नोंदणीची सुरवात करावी. जे पक्ष वाढवण्यात सहकार्य करणार त्यांच्यावर कुठेही अन्याय होणार नाही.

विजय नगराळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पक्षात काम करताना येणा-या अडचणींकडे लक्ष वेधले. वणी तालुका अध्यक्ष सूर्यकांत खाडे व मारेगाव तालुका अध्यक्ष भारत मत्ते यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे, सूर्यकांत खाडे, विजय नगराळे, धीरज कुचनकार, हेमंत गावंडे, मनोज वाकटी, राजू उपरकार, रामकृष्ण वैद्य, आशुतोष नागरिक, सचीन चव्हाण, प्रशांत सलाम, प्रणय बल्की, अखिलेश जयस्वाल यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा:

…आणि खुद्द नगराध्यक्षच राहायचे गैरहजर: सत्ता येऊनही तोटा झालेली टर्म

ढेप खरेदी करून 11.5 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल

 

Comments are closed.