नागेश रायपुरे, मारेगाव: जीवनात यशस्वी होण्याकरिता विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहे, मात्र त्या संधीचं सोनं करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. विविध क्षेत्रासह पत्रकारिता करुन अनेक जण यशस्वी झाले. फक्त पत्रकारिता करताना ग्रामीण भागातील दाहक वास्तव मांडण्यासाठी लेखनी वापरली तरच यशाचे शिखर गाठता येऊ शकते. असे प्रतिपादन पत्रकार ज्योतिबा पोटे यांनी केले. मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप केलोडे होते, तर प्रमुख अतिथी पत्रकार अशोक कोरडे, चिंचाळा येथील प्रतिष्ठित नागरिक रमेश चिकटे होते. संचालन पवन या विद्यार्थ्यांने केले. तर आभार अजिंक्य कोरडे यांनी मानले,
मारेगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे शिबिर दि. २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान चिंचाळा येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात कला वाणिज्य महाविद्यालयातील ७५ विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत. या शिबिरात विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.