भीक नको हक्क हवा, देत नसाल तर पाटी पाहा

●जातीनिहाय जनगणनेसाठीओबीसी महिला समन्वय समितीचा एल्गार

0

जितेंद्र कोठारी, वणी: सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून वणी तालुक्यातील ओबीसी महिला समन्वय समितीने “2021च्या जनगणनेत ओबीसीचा कॉलम नाही’, OBC (NT, VJNT, SBC)चा जनगणनेत सहभाग नाही’ अशा आशयाच्या पाट्या आपल्या घरासमोर लावण्याचा आवाहन केले.

जर सरकार ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करत नसेल, तर येणाऱ्या जनगणना कार्यक्रमास असहकार करण्याचा इशाराही समितीने दिला आहे. याबाबत आयोजित मोर्चाच्या संदर्भात ओबीसी महिला समन्वय समीतीने पाठिंबा दिला.

या मोर्चामध्ये ओबीसी महिला समन्वय समितीच्या अध्यक्ष अर्चना बोदाडकर संस्थेचे सर्व पदाधिकारी वंदना आवारी, वृंन्दा पेचे, राणी दोडके, निशा उज्वलकर, वंदना गिंन्नलवार, ज्योती सुर, ज्योती ढाले, सविता रासेकर, कविता चटकी, माया महाकुलकर, मनीषा देरकर, गीतांजली माथनकर तसेच (NT/VJNT/SBC) मध्ये येणाऱ्या महिला खूप मोठया संख्येनी उपस्थित होत्या.

हेदेखील वाचा

आरसीसीपीएल कंपनीतील सेक्युरीटी गार्ड व तरुणांची एकमेकास मारहाण

हेदेखील वाचा

बालिकादिनाला बालिकाच ठरल्यात अव्वल

Leave A Reply

Your email address will not be published.