ओबीसी मोर्चा नियोजनाबद्दल मुकुटबन येथे आढावा बैठक.

वणीत होणाऱ्या जानेवारीतल्या मोर्चासंबंधात झाली चर्चा

0

सुशीलओझा, झरी: ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी. या मागणीसाठी येत्या 3 जानेवारीला वणीत ओबीसी, विजे एन टी, एस बी सी समाजबांधवातर्फे काढण्यात येणार आहे. या संदर्भात शनिवारी मुकुटबन येथील राजराजेश्वर मंदिर बैठक झाली. या बैठकीत झरी तालुक्यात मोर्चा आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी जातनिहाय जनगणना कृतिसमितीचे अध्यक्ष प्रदीप बोनगीनवार होते. या वेळी वणी येथील मोहन हरडे, विकास चिडे, राजेश पहापळे, रुद्रा कुचनकार यांनी मार्गदर्शन केले. संचालन संदीप आसुटकर यांनी केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

भूमारेड्डी, येनपोतुलवार, केशव नाकले, नेताजी पारखी, नितेश ठाकरे, देव येवले, केतन ठाकरे, मंगेश चामाटे, पुरुषोत्तम आसुटकर, लक्ष्मण मालेकर, सचिन गोडे, नीलकंठ धगडी, चिंतेश्वर वैद्य, दिनेश ठाकरे, शंकर झाडे, गणेश वऱ्हाटे, मंगेश झाडे, शुभम राऊत, प्रवीण बोधे, संदीप येवले, विठ्ठल मांडवकर, प्रणय काळे, दिवाकर हिरादेवे, संजय आसुटकर उपस्थित होते.

हेदेखील वाचा

 

हेदेखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.