आजारपणाला कंटाळून वृध्दाने केली आत्महत्या

वणी तालुक्यातील कोना येथील घटना

जितेंद्र कोठारी, वणी: मानसिक आजाराने कंटाळून एका वृद्ध व्यक्तींने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार 19 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता उघडकीस आली. जनार्धन नामदेव ढवस (73) रा. कोना, ता. वणी असे आत्महत्या केलेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत प्रभाकर जनार्धन ढवस (48) रा. मारेगाव यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार फिर्यादीचे आई वडील जुना कोना या गावात राहत होते. मागील काही दिवसांपासून वडील जनार्धन ढवस मानसिक आजाराने त्रस्त होते. आजारामुळे ते नेहमी झोपेच्या गोळ्या घेत होते. वडिलांच्या घराशेजारी राहणारे शिरपूरकर यांनी बुधवारी सायंकाळी 5 वाजता दरम्यान फिर्यादी याना फोन करून त्यांच्या वडिलांने घरातील आड्याला कॉटनच्या दोरीने गळफास घेतल्याची माहिती दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

माहिती मिळताच फिर्यादी कोणा येथे पोहचले असता वडील जनार्धन ढवस गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. तक्रारीवरून वणी पोलिसांनी कलम 174 अनव्ये मृत्यूची नोंद केली असून प्रकरणाचा पुढील तपास ए एस आय प्रभाकर कांबळे करीत आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.