जितेंद्र कोठारी, वणी: आयपीएल क्रिकेट मॅचवर अवैधरित्या ऑनलाइन जुगार खेळवित असताना (बेटिंग) एका व्यक्तीला वणी पोलिसानी शनिवार 2 सप्टें. रोजी नायगाव (खुर्द) गावातून अटक केली आहे. सतीश रघुराम मेहतो, रा. दामोदर नगर नायगाव (खुर्द) असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे. मागील 10 दिवसात आयपीएल क्रिकेट मॅच सट्टयावर पोलिस कार्यवाहीची ही तिसरी घटना आहे.
स्थानिक डीबी पथक प्रमुख सपोनि आनंद पिंगळे यांना मुखबिर कडून नायगाव येथे आयपीएल मॅचवर सट्टा सुरु असल्याची माहिती मिळाली होती. महितीवरुन डीबी पथकाने शनिवार रात्री 8.30 वाजता दरम्यान नायगाव (खुर्द) येथील सतीश मेहतो याच्या घरावर धाड टाकली.
घराचे लोखंडी गेट बंद असल्यामुळे पोलिस कर्मचारी कंपाऊंड ओलांडून आंगणात शिरले. घराच्या दरवाज्याला बाहेरून बंद करून पोलिसानी बेडरूमच्या खिडकीतून डोकावून पहिले असतं एक इसम मोबाइलवर क्रिकेट बॅटिंग जुगार खेळत असल्याचे दिसून आला. त्यानंतर पोलिसानी घरात प्रवेश करून सदर व्यक्तीला अटक केली.
अटक केलेल्या आरोपीकडून ऑप्पो, विवो आणि सेमसंग कंपनीचे 3 मोबाईल हँडसेट, रोख 60850 रुपये तसेच मोबाइल चार्जर, मटका पट्ट्या, पेन, कॅल्कुलेटर आणि इतर साहित्य असे एकूण 105960/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. सपोनि आनंदराव पिंगळे यांच्या फिर्यादवरुन वणी पोलिस ठाण्यात आरोपी विरुद्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4,5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही पोलिस निरीक्षक शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात सपोनि आनंद पिंगळे, डीबी पथक कर्मचारी सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, अशोक टेकाडे, पंकज उंबरकर, दीपक वांडर्सवार, विशाल गेडाम व महिला पोलिस कर्मचारी जया रोगे यांनी पार पाडली.
बेटिंगसाठी ऍपचा वापर
आरोपी हा क्रिकेट लाइन गुरु या मोबाइल एपच्या माध्यमातून आकडे पाहून चेन्नई सुपर किंग विरुद्ध राजस्थान रॉयलच्या आयपीएल मॅचवर ग्राहकाना क्रिकेट बॅटिंग जुगार खेळवत होता. मॅचनंतर पैशाची देवाण घेवाण करीता आरोपी आपल्या भारतीय स्टेट बँकमधील खात्यातून ग्राहकाना ऑनलाइन ट्रानजॅक्शन करीत होता.
हे देखील वाचा:
शेतक-यावर रानडुकराचा हल्ला, टाके मारल्यानंतर दिसला रानडुकराचा दात
Comments are closed.