मोबाईल नंबर न दिल्याने शाळकरी मुलीचा विनयभंग

मजनुची पीडितेला भर रस्त्यात मारहाण, विठ्ठलवाडी येथील घटना

0

विवेक तोटेवार, वणी: शाळकरी मुलीने मोबाईल नंबर न दिल्याने एका मजनुने तिचा विनयभंग केला. काल बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ट्युशन क्लास करून घरी परत जात असताना शहरातील वरोरा रोडवर ही घटना घडली. या मजनुने पीडितेला भर रस्त्यात मारहाणही केली. पीडितेच्या तक्रारीवरून वणी पोलीस स्टेशन येथे आरोपीविरोधात पोस्कोसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी ही इयत्ता 10 व्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती सकाळी 10 वाजता ट्युशन साठी जात होती व 11 वाजता परत येत होती. 4 जुलै रोजी ती ट्युशन संपल्यावर घरी परत जात असताना विठ्ठलवाडी मध्ये एका अनोळखी मुलाने तिला रस्त्यात थांबवून तिचा मोबाईल नंबर मागितला होता. यावर पीडितेने लक्ष दिले नाही व ती तिथून निघून गेली.

त्यानंतर सदर आरोपी तिचा 3 दिवसांपासून पाठलाग करीत होता. काल बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ती पीडित मुलगी ट्युशनहुन वर्ग मैत्रीनी सोबत येत होती. यादरम्यान तीच आरोपी मुलगा दुचाकीवरून आला व त्याने पीडितेला मोबाईल नंबर का देत नाही? म्हणून ऊन्ह विचारले.

एवढ्यावरच आरोपी थांबला नाही तर त्याने पीडितेचे केस पकडून तिला रस्त्यावरच मारहाण केली. तसेच आताही जर मोबाईल नंबर दिला नाही तर पुन्हा मारणार अशी धमकीही त्याने पीडित मुलीला दिली. सदर घटनेने पीडित मुलगी खूप घाबरली. सदर आरोपी मुलाबाबत माहिती काढली असता त्याचे नाव शीव शेंगर (20) रा. रंगनाथ नगर, वणी असल्याची माहिती पीडित मुलीला मिळाली.

याबाबत मुलीने कुटुंबियांना माहिती दिली असता पीडितेच्या कुटुंबीयांनी वणी पोलीस स्टेशन गाठत आरोपी विरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून आरोपी शीव शेंगर विरुद्ध कलम 354 ड (1) 323, 506 सहकलम 12 बाललैंगिक संरक्षण अधिनियम 2012 (पोस्को) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय माया चाटसे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.