झरी तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित पीक विम्याची रक्कम द्या
भाजपाचे तहसीदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना अजूनपर्यंत शासनाकडून पिकविम्याचे पैसे मिळाले नाही, तर काही शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला असला तरी त्याची रक्कम खूप कमी आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे व आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असा आरोप करीत तालुका भाजप तर्फे निवेदन देण्यात आले आहे.
झरी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकविम्याचा पुरेसा लाभ मिळाला नाही त्यामुळे शेतकरी विमासंरक्षणापासून वंचित राहत आहेत. तालुक्याला लागून असलेल्या पांढरकवडा येथील शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात पिक विम्याची रक्कम प्राप्त झाली आहे. त्यामुळे आदिवासी बहुल झरीजामणी तालुक्यातील शेतक यांमध्ये प्रचंड नाराजी आहे पसरली आहे.
इतर तालुक्यात योग्य रक्कम व इतर सुविधा मिळत असताना झरी तालुक्यातील शेतकऱ्यांना का मिळत नाही ? असा भेदभाव का केला जात आहे असा संतप्त प्रश्न झरी तालुका भाजपकडून केल्या जात आहे. तरी तालुक्यात पुन्हा सर्वेक्षण करून शेतक-यांना पिक विम्याची रक्कम तातडीने देण्याबाबत संबंधीत विमा कंपन्यांना आदेश देण्यात यावे अशी मागणी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार सह भाजप पदाधिकारी यांनी केली आहे.
तालुक्यातील शेतक-यांना पिक विम्याची रक्कम देण्यास विमा कंपनी टाळाटाळ करित असल्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होत आहे. हा अन्याय भारतीय जनता पार्टी खपवून घेणार नाही असा इशारा देत शेतकयांना पिक विमा न मिळाल्यास तालुक्यातील शेतक-यांना सोबत घेवून भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरणार व तीव्र आंदलन करणार व त्यांची संपुर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा देण्यात आला आहे.
सदर निवेदन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात भाजपचे तालुका अध्यक्ष सतीश नाखले, पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्रावार, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश मानकर ,सामाजीक तथा भाजप कार्यकर्ते सुरेश बोलेनवार, भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते अशोकरेड्डी बोदकुरवार ,सचिन दुम्मनवार सह तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांनी दिले.
हे देखील वाचा:
गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांची जिल्हा परिषद शाळेला भेटी