बहिणीला भेटायला आला आणि गळफास घेऊन जीवन संपविले

खापरी येथील युवकाची वेळाबाई येथे आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी : बहिणीला भेटायला आलेल्या तरुणाने तिच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत वेळाबाई येथे ही घटना गुरुवार 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. बादल त्र्यम्बक मेश्राम (24) रा. खापरी ता. झरी असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, वेळाबाई येथील संदीप मारोती परचाके याचा साळा बादल मेश्राम गुरुवारी वेळाबाई येथे बहिणीला भेटायला आला होता. त्यावेळी त्याची बहीण शेतात जाऊन होती तर भाऊजी संदीप परचाके कामानिमित्त घुग्गुस येथे गेले. सायंकाळी बादल याची बहीण शेतातून घरी आली असता बादल हा लाकडी फाट्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

मृतक हा झरी तालुक्यातील खापरी गावाचा असून त्याला आई वडील नाही. मागील 2-3 वर्षापासून तो खापरी येथे आला नसून पुणे येथे काही खाजगी काम करीत असल्याची माहिती आहे. बादल यांनी आत्महत्या का केली ? याबाबत काही कळू शकले नाही. शिरपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून प्रकरणाची नोंद केली आहे. 

हे देखील वाचा –

अडेगाव येथील ‘त्या’ तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

Comments are closed.