पिंपरी-बाबापूर रस्त्यालगत तरुणाचा मृतदेह; घातपात की आत्महत्या याचा तपास सुरू

जंगलात झुडपात मृतदेह आढळला, तपास सुरू

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील पिंपरी-बाबापूर रस्त्यालगत जंगलात आज (रविवार) दुपारी सुमारे 12 वाजताच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृताची ओळख मयूर पुरुषोत्तम असूटकर (वय 26, रा. बाबापूर) अशी झाली आहे.

मयूर हा 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो परत न आल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु तो सापडला नव्हता. आज दुपारी रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना झुडपात एक मृतदेह दिसल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळी पोहोचलेल्या शिरपूर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. मयूरचा मृत्यू घातपात आहे की आत्महत्या, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मयूर हा आपल्या वडिलांसोबत बाबापूर येथे राहत होता. काही वर्षांपूर्वी त्याच्या आईचे निधन झाले असून, त्याची एक विवाहित बहीण आहे. घरचा कर्ता मुलगा गमावल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Comments are closed.