यंदा भरणार नाही पोळा, सार्वजनिक गणपतीचे जागेवरच विसर्जन

मुकुटबन पोलिसस्टेशनात झाली पोलीस पाटील, गणेशमंडळांची बैठक

0

सुशील ओझा, झरी: कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून यावर अंकुश लावण्याकरिता शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यात पोळा सण व सार्वजनिक गणपती बसविण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण पोळा असून मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक ठिकाणी पोळा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. परिसरात १०० च्या वर सार्वजनिक मंडळं गणपती बसवतात. कोरोना विषाणूचा प्रसार होऊन रुग्णाच्या संख्येत वाढ हाऊ नये याकरिता जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांनी पोळा व सार्वजनिक गणेश मंडळावर बंदी घातली आहे.

याबाबतची बैठक जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये होत आहे. पोलीस पाटील, गणेशमंडळांच्या पदाधिकारी यांची बैठक घेऊन याबाबत सूचना तसेच मार्गदर्शन करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व ठाणेदार धर्मा सोनुने यांनी पोलीस पाटील व गणेश मंडळच्या पदाधिकारी यांची बैठक घेऊन सार्वजनिक पोळा सणावर बंदी घालण्यात आली .

सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या घरीच बैलाची पूजा करून आपला सण घरीच साजरा करावा. तसेच सार्वजनिक गणपती बसविण्यात शेकडो लोकांचा सहभाग होतो. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे सार्वजनिक गणपती बसवा परंतु दोन फुटांपेक्षा जास्त उंची नसावी.

गणपती घरी बसवावे व घरीच विसर्जन करण्याची व्यवस्था करावी. विसर्जनाकरिता डीजेवर बंदी घालण्यात आली आहे. गर्दी नसावी. अशा अनेक गोष्टींवर मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्वच पोलीस पाटील यांना सूचना करण्यात आल्या व प्रत्येक गावातील गणेश मंडळ व पोळा सण भरविण्याबाबत येऊ नये. याबाबत पोलीस पाटील यांना गावात माहिती देण्याचे आदेश पोलीस अधिकारी नायक व सोनुने यांनी दिलेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.