आरोग्य कर्मचाऱ्यांना “मनसे” कडून पीपीई (PPE) किटचे वाटप

उपविभागीय अधिकारी यांना सोपविले पीपीई किट

0
जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना विषाणूचा संसर्ग देशात वाढू लागला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना आवश्यक असणार्‍या पीपीई किटची गरज लक्षात घेवून मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्वखर्चाने पीपीइ किट खरेदी करून उपविभागीय अधिकारी, वणी यांच्याकडे सुपूर्त केली.
एकीकडे कोरोनाचे संकट दिवसोंदिवस वाढत असताना नागरिकांना घरातच रहाण्याचे आव्हान केले जात आहे तर  दुसरीकडे कोरोंनाचा मुकाबला करण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना वॉरियर्स म्हणून उभे असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्सेस व शासकीय दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना  पीपीई (स्वयंरक्षक किट), हँड ग्लोव्हज मिळत नसल्याने त्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती बळावली आहे.
राज्यातील कोरोनाचा संकट काही कमी होतांना दिसत नाही. यवतमाळ जिल्ह्यात गुरुवारी ८ कोरोना बाधितांची भर झाल्याने जिल्ह्यात आता  कोरोना बाधितांची संख्या १४ वर पोहचली आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागासह पोलीस प्रशासना समोरील आणखी आवाहन वाढले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढल्याने अनेक ठिकाणी खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद केले आहेत. तसेच सुरक्षा साधने नसल्याने ते सर्दी, खोकला तसेच तापाचे रुग्ण तपासत नाहीत.
काही जण आपल्याकडे असलेल्या सुरक्षा साधनांचा उपयोग करून जीव मुठीत घेऊन रुग्णसेवा पुरवीत आहेत. त्यामुळे या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर यांनी स्वतः पुढाकार घेत हे सुरक्षा किट मागवून तालुक्यातील कोरोना वारीयर्स डॉक्टरांना देण्याकरिता वणी येथील  उपविभागीय अधिकारी डॉ.शरदचंद्र जावळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.
 सध्या बाजारात पीपीई किटची कमतरता असल्यामुळे 20 कीट  उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिवाय वणी विधानसभा मतदारसंघात  असलेले शासकीय दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी कार्यरत  डॉक्टर, नर्सेस तसेच करोनाच्या सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेले शासनाचे कर्मचारी आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याना ही सुरक्षा किट पुरविली जाणार असल्याचं उंबरकर यांनी सांगितले. यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर सह  धनंजय त्रिंबके, आजीद शेख, इरफान सिद्दीकी, शुभम पिंपळकर, अनिकेत येसेकर आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यात तसेच यवतमाळ जिल्ह्यात वेगाने कोविड -19 विषाणूचा प्रसार होत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांकडे पुरेशी साधने उपलब्ध नसून त्यांना आपला जीव मुठीत घेऊन रुग्णसेवा करावी लागत आहे. मनसेकडून सामाजिक बांधिलकी जपून या कोरोना वारीयर्ससाठी पीपीई किट देण्यात आले आहे. गरज पडल्यास जास्त पीपीई किट मनसेकडून उपलब्ध करून देण्यात येईल. – राजू उंबरकर, मनसे राज्य उपाध्यक्ष

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.