पॉकेटमनीतून ‘प्रयास’ने राबवले विविध सामाजिक उपक्रम

लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांनी ठेवला वणीकरांसमोर आदर्श

0

जब्बार चीनी, वणी: शहरातील प्रयास या सोशल गृपद्वारा लॉकडाऊन काळात विविध सामाजिक कार्य करण्यात आले. यात गरजुंना धान्य वाटप, रुग्णाला आर्थिक मदत, वृक्षारोपण इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या गृपमधले बहुतांश सदस्य हे विद्यार्थी दशेतील आहेत. केवळ सामाजिक व मानवतेच्या हेतूने हे विद्यार्थी विविध उपक्रम राबवत आहे व त्यांनी त्यांच्या पॉकेटमनीतून आलेल्या पैशातील बचतीतून हे उपक्रम राबवले आहेत.

लॉकडाऊन काळात अनेकांना अन्नधान्याची गरज होती. शहरातील काही विद्यार्थ्यांनी पॉकेटमनीच्या पैशातून लॉकडाऊनच्या काळात मदत करण्याचा निश्चय केला. मात्र त्या तुटपुंज्या पैशात खूप काही करता येत नव्हते. विद्यार्थ्यांचा हा ‘प्रयास’ बघून अनेक दानशुरांनीही त्यांना मदत केली. पुढे या रकमेतून त्यांनी 30 धान्याची किट तयार करून ती शहरातील गरजूंना दिली.

स्माईल फॉउंडेशनच्या वृक्षरोपणात सहकार्य
पर्यावरण क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारी शहरातील स्माईल फाउंडेशनद्वारा आयोजिक वृक्षारोपणात प्रयासचे सदस्य सहभागी झालेत. विविध ठिकाणी करण्यात आलेल्या वृक्षारोपणात प्रयासचे सदस्यांनी देखील हातभार लावला. यासह एका गरीब रुग्णांच्या ऑपरेशनसाठी प्रयासने एक हजार रुपयांची मदत केली.

विविध उपक्रमासाठी “प्रयास ग्रुप”चे आदित्य चिंडालिया, सागर जाधव, प्रीती कोचेटा, मिताली कोचेटा, प्रियल कोचेटा, रोशनी जैन, शुभम जोबनपुत्रा, ऋषभ मुनोत, अनन्य चिंडालिया इत्यादींनी परिश्रम घेतले. यापुढेही प्रयासचे काम सुरू राहणार आहे. जर कुणाला काही मदत करायची असल्यास त्यांनी 7558620100 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

हे देखील वाचा:

करा आपले लॅपटॉप/कॉम्प्युटर फास्ट व अप टू डेट

सर्वात कमी किमतीत शेतीच्या कुंपणासाठी झटका मशिन उपलब्ध

Leave A Reply

Your email address will not be published.