विविध समस्यांचे निराकरण व्हावे – विक्रांत चचडा
जिल्हा युवासेनेने दिले नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना स्मरणपत्र
जब्बार चीनी, वणी: विविध समस्यांचे निराकरण व्हावे अशी मागणी जिल्हा युवासेना अधिकारी विक्रांत नंदकिशोर चचडा यांनी केली. त्यासाठी त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी स्मरणपत्र दिले. त्याच्या प्रतिलिपी उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना सादर केल्यात.
वणीतील ओव्हरलोड वाहतुकीच्या संदर्भात यापूर्वी चचडा यांनी निवेदन दिले होते. शहरातील खड्डे बुजविण्यात यावेत अशीही मागणी त्यांनी केली होती. तरीदेखील याची चौकशी अथवा यांवर कारवाई झाली नसल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
सर्वत्र प्लास्टिकबंदीचा आदेश आहे. तरीदेखील शहरात बंदी असलेल्या प्लास्टिकचा सर्रास वापर होतो. त्यावरदेखील कारवाई झाली नसल्याचं चचडा यांचं म्हणणं आहे. शहरातील मोकाट जनावरांचा वाहतुकीला अडथळा होतो. तसेच नागरिकांनादेखील त्याचा त्रास होतो. त्याचाही काही बंदोबस्त झाला नसल्याचं निवेदनात नमूद केलं आहे. या विविध समस्या 15 दिवसांत सोडवल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा विक्रांत चचडा यांनी दिला आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा