स्थानिक पत्रकारांच्यावतीने पत्रकारदिन साजरा

मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र 'दर्पण' सुरू झाले होते 6 जानेवारीला

0

पुरुषोत्तम नवघरे, वणी: बुधवार 6 जानेवारीला स्थानिक पत्रकारांच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून  पत्रकारदिन साजरा करण्यात आला. मराठी भाषेतील पाहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी सुरू करण्यात आले. त्या दिवसापासून पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येते.

समाजाचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी इ.स.1832 रोजी दर्पण नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्या दिवसाची आठवण म्हणून 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात “मराठी पत्रकार दिन” म्हणून साजरा केला जातो. ब्रिटीश राज्यकर्त्यांना कळावे म्हणून त्याकाळी दर्पणचा एक स्तंभ मराठीत व एक स्तंभ इंग्रजीत असे.

यावेळी राजू धावंजेवार, संजय खाडे, रमेश तांबे, सुरेंद्र बोथरा, श्रीकांत किटकुले, मो.मुश्ताक, पुरुषोत्तम नवघरे, महादेव दोडके,अर्जुन मस्के आदी शहरातील पत्रकार उपस्थित होते.

हेदेखील वाचा

भीक नको हक्क हवा, देत नसाल तर पाटी पाहा

हेदेखील वाचा

साई लॅपटॉप व कॉम्प्युटर गॅलरीमध्ये मकरसंक्रांती ऑफर

Leave A Reply

Your email address will not be published.