आरोपपत्र असताना पदोन्नती!

वेकोलि वणी नार्थचा प्रताप

0

जब्बार चीनी, वणी: वेकोली वणी नार्थमधील एका कर्मचाऱ्यावर आरोप पत्र असताना प्रबंधनाने त्याला पदोन्नती देण्याचा प्रताप केला आहे. या संबंधीची तक्रार विजिंलेस कडे करण्यात आली असून सदर प्रकरणाची चौकशी सुरू झाल्याने संबंधीताचे धाबे दणाणले आहे.

Podar School 2025

विजिलेंसला पाठवलेल्या तक्रारीत म्हटले आहे. की सध्या वणी रेल्वे सायडिंगवर लोडींग इंचार्ज पदावर कार्यरत सुधाकर ढाले हे 1993मध्ये माजरी क्षेत्रातील कावडी ओपन कास्ट मध्ये कार्यरत असताना वेकोलिच्या भंगारचोरी प्रकरणात उपक्षेत्रीय प्रबंधकांनी त्यांना चार्जशीट दिली होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यानंतर 2013 मध्ये वणी नार्थमध्ये पिंपळगाव व जुनाड उपक्षेत्रीय प्रबंधकांनीदेखील त्यांना ड्युटीवर गैरहजेरीबद्दल दोन चार्जशीट दिल्या होत्या. ढाले हे तेव्हा सहाय्यक लोडींग सुपरींटेंडेन्ट होते. परंतु तीन तीन चार्जशीट असताना त्यांना प्रबंधनाने पदोन्नती देऊन लोडींग सुपरींटेंडेन्ट केले.

महत्त्वाचे म्हणजे सप्टेंबर 2019 मध्ये कोलारपिंपरी काट्यावर एका ट्रान्सपोर्टरकडून लाच मागितल्याचा विडियो व्हायरल झाला होता. या प्रकरणात तत्कालीन उपक्षेत्रीय प्रबंधक आर.के.प्रसाद व सुधाकर ढाले यांची तत्काळ बदली करण्यात आली होती.

हे सर्व असताना वेकोली प्रबंधकांनी त्याला वणी रेल्वे सायडींगवर लोडींग सुपरींटेंडेन्टे इंचार्ज या महत्वाच्या पदावर नियुक्ती केली. एखाद्या कर्मचारी किंवा अधिकारी यांच्यावर आरोपपत्र असताना त्यांची विभागीय चौकशी होईपर्यंत त्यांना पदोन्नती तर सोडाच पण महत्वाच्या पदावर नियुक्तीसुद्धा देता येत नाही.

पण वणी नार्थ क्षेत्रातील कार्मीक विभागाने या कर्मचा_याला पदोन्नती देऊन सेन्सेंटीव्ह पदावर नियुक्ती करण्याचा प्रताप दाखविला आहे. यामागे मोठे अर्थकारण असल्याची चर्चा आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.