बुधवारी वणीत ओबीसी आरक्षणासंदर्भात निदर्शने

स्वतंत्र जनगणना व राजकीय आरक्षणासाठी ओबीसी आक्रमक

जब्बार चीनी, वणी: ओबीसींची स्वतंत्र जनगणना व ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी बुधवारी 22 सप्टेंबर रोजी ओबीसी महासंघाद्वारे राज्यभर निदर्शने केली जाणार आहे. वणीत देखील यासंदर्भात जोरदार निदर्शने करण्यात येणार आहे. आज जनता शाळेत ओबीसी महासंघातर्फे पत्रकार परिषदेत ही माहिती घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन होणार आहे.

केंद्र सरकारने 2021 च्या जनगणना कार्यक्रमात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी व भारतीय संविधानाच्या कलम 243 (ड) (6) आणि कलम 243 (ट) (6) मध्ये सुधारणा करुन ओबीसी संवर्गाला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरीषद, महानगरपालिका, नगरपरीषद, नगर पंचायत मध्ये 27 टक्के राजकिय आरक्षण राहील अशी तरतूद करावी अशी प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयानी घालून दिलेली आरक्षणाची 50 टक्के मर्यादा रद्द करण्याची घटनेमधे तरतूद किंवा सुधारणा करुन संपुर्ण देशातील ओबीसींना केंद्र सरकारने न्याय मिळवून दयावा. अशीही मागणी आहे. वणीत बुधवारी दिनांक 22 सप्टेंबरला तहसीलसमोर याबाबत निदर्शने करण्यात येणार आहे व त्यानंतर प्रशासनाला याबाबत निवेदन सादर केले जाणार आहे.

याकरीता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात राज्यभर निदर्शने करुन केंद्र सरकारला निवेदन देण्यात येणार आहे.

या निदर्शनात ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे भालचन्द्र चोपणे, विजय पिदुरकर, मोरेश्वर पावडे, देविदास काळे, गोविंदरावजी थेरे, गणपतराव लेडांगे, प्रा. टीकाराम कोन्गरे, गणपत लेडांगे, दिनकर पावडे, सुरेश बरडे,विवेकानंद मांडवकर, विलासराव मांडवकर, रवि देवाळकर यांनी केले आहे.

हे देखील वाचा:

…आणि ईश्वरचिठ्ठीने झाला लढतीचा फैसला

अडकोली शिवारात गीर गायीवर वाघाचा हल्ला

Comments are closed.