मुकुटबन पीएचसीला रुग्णवाहिका (108) उपलब्ध करून दया

जिल्हा परिषद अध्यक्षांकडे युवासेनेची मागणी

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सर्वात मोठे शहर असलेक्या मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ऍम्बुलन्स (108) उपलब्ध करून देण्याची मागणी झरी तालुका युवासेनेतर्फे करण्यात आली. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

Podar School 2025

जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार यांचे 12 जुलै रोजी दुपारी मुकुटबन येथे आगमन झाले. ग्रामपंचायतीला भेट देऊन त्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण व इतर सुविधेबाबत माहिती घेऊन त्यांनी आरसीसीपीएल कंपनीला भेट दिली. मुकुटबन आरोग्य केंद्रांतर्गत 50 ते 55 गावातील रुग्ण उपचार करिता मुकुटबन येथे येतात.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

डिलेवरी, ऑपरेशन, नसबंदी व इतर उपचार तिथे केला जातो. परंतु इमर्जन्सी काळात रुग्णाला रेफर केल्यास वणी यवतमाळ किंवा इतर ठिकाणी हलविण्याची वेळ आल्यास रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे रुग्णाचे हाल होताहेत.

रुग्णला बाहेर गावी हलविण्या करिता खाजगी वाहन करून जावे लागते त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावे लागत आहे. तर गरीब जनतेला पैसे नसल्याने मोठे त्रास सहन करावे लागते. यात जीव सुद्ध धोक्यात येतो. अनेकदा परिसरात अपघात घडले परंतु रुग्णवाहिका नसल्याने जनतेला मोठी अडचण निर्माण झाली.

मुकुटबन येथे सिमेंट कंपनीचे काम सुरू असल्यामुळे हजारो कामगार वास्तव्यास आहे व परिसरात डोलोमाईट व चुना फॅक्टरी असल्यामुळे लोकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. ग्रामवासी परिसरातील व कंपनीचे हजारो लोकांच्या ईलाज करिता एकमेव शासकीय रुग्णालय असल्याने जनतेचा विचार करिता झरी युवासेना सरसावली व मुकुटबन ग्रामीण रुग्णालयात कोणत्याही रुग्णाची बाहेर गावी जाण्याकरिता कोणतीही अडचण होऊ नये याकरिता (108) एमबुलन्स ची मागणी केली व तसे निवेदनही देण्यात आले.

निवेदन शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार विश्वास नांदेकर विक्रांत चचडा युवा सेना जिल्हा प्रमुख, चंद्रकांत घुगुल् शिवसेना तालुका प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदा पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सीताराम पिंगे शिवसेना उप तालुका प्रमुख, चेतन बारशेट्टीवार युवासेना विभाग प्रमुख, अनिल द्यागलवार संदीप धोटे, राहुल राजुकर, सचिन कोठारी, शशिकान्त क्षीरसागर, प्रशिक बरडे, अमर सातघरे,मंगेश माहुरे, अर्जुन कोडापे, कुणाल टेकाम, गोपाळ ताटेवार, कुणाल मेश्राम, आशिष पोल्हे, राजू लोढे, निखिल ठाकरे, ललित शिरपूरकर‌, हरिदास सुरुपाम, शैलेश ठाकरे उपस्थित होते.

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.