पुंडलिकराव जामलीवार यांचे वृद्धपकाळाने निधन

सेवानिवृत्त शिक्षक आणि बेलदार समाज बहूउद्देशीय संस्थेचे होते माजी अध्यक्ष

0

विवेक तोटेवार, वणी: 3 डिसेंबर गुरुवार पहाटे 4 वाजता सेवानिवृत्त शिक्षक पुंडलिकराव बापूजी जामलीवार (88) रा. रामपुरा वॉर्ड, वणी यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांनी शिक्षक या पदावर राहून जवळपास 40 वर्षे ज्ञानदानाचे कार्य केले. 1991 मध्ये ते सेवानिवृत्त झाले.

त्यांनी मंदर येथे मुख्याध्यापक या पदावर सेवा दिली. तसेच ते बेलदार समाज बहूउद्देशीय संस्था वणीचे माजी अध्यक्ष होते. त्यांनी रामपूरा वार्ड वणी येथील आपल्या घरी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे एक मुलगा 6 मुली, 16 नातू असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिवारात शोककळा पसरली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

 

Leave A Reply

Your email address will not be published.