भास्कर राऊत, मारेगाव: वीज मंडळ आणि बांधकाम विभागाच्या वादाचा परिसरातील नागरिकांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या कामामध्ये विजेचा खांब आल्याने तेथील रस्त्याचे काम थांबवले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणा-यांना मोठी कसरत करावी लागत आहे. सर्वांना ही समस्या दिसत असूनही यावर तोडगा निघत नसल्याने नागरिक चांगलेच हवालदिल झाले आहे.
मार्डी, मारेगाव तालुक्यातील सर्वात महत्वाचे गाव तसेच मोठी बाजारपेठ. नुकताच खैरी ते नांदेपेरा या रस्त्याचे काम करण्यात आले. हे काम मार्डी येथील पंडिले यांच्या शेतापासून ते आदर्श हायस्कूल जवळील पुलापर्यंत सिमेंट काँक्रेटचे करण्यात आले. हे सिमेंट काँक्रेटचे काम होत असतांना मार्डी येथील मटणमार्केट जवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूनी विजेचे खांब जीवंत विद्युत तारेसह उभे आहेत. ही मारेगाव वरून आलेली मुख्य लाईन असल्याने या खांबाना अजूनपर्यंत हलवलेले नाही.
रस्त्याला लागूनच विजेचे खांब आल्याने रस्ता ठेकेदारानेही तेवढी जागा सोडून उर्वरित रस्त्याचे काम आटोपले. जिथे अजूनही काम झालेले नाही तिथे रस्त्याच्या कामाच्यावेळी वेळी मोठा खड्डा पडला. आता त्या खड्यामध्ये पाणी साचलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तसेच वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकजण नेते,
पुढारी आणि महत्वाच्या व्यक्ती या रस्त्याने जाणेयेणे करतात. तरीपण यापैकी कोणीही याकडे गांभीर्याने बघत नसल्याचे दिसत आहे. अनेकदा नवीन वाहनांना अंदाज येत नसल्याने मोठा अनर्थ सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुचाकीची वाहनधारकांची तर अत्यंत बिकट अवस्था दिसून येत आहे. अनेक दुचाकी वाहनधारक त्यांना चिखलाचा अनेकवेळा सामना करावा लागल्याचे चित्र आहे.
सदर काम बांधकाम विभागाचे – उपअभियंता
रस्त्यावरील विजेचे खांब हटविण्यासाठी बांधकाम विभागाला वेगळा असा फ़ंड मिळत असतो. त्या फंडामधील रक्कम भरून जुने खांब काढणे आणि नवीन खांब लावणे हे आता बांधकाम विभागाचे काम आहे. त्यांनी आम्हाला फक्त आदेश देऊन 33 kv चा विजेचा प्रवाह केव्हा बंद करावा हे सांगावे. आम्ही यासाठी तत्पर आहोत.
– शैलेश पाटील, उप कार्यकारी अभियंता, मारेगाव====================
लवकरच कामाला सुरूवात होईल – साबांवि
विजेचे खांब हटविण्यासाठी जी रक्कम आहेत टी 15 लाख रुपये बांधकाम विभागाने वीज विभागाकडे भरलेले आहे. आता दोनतीन दिवसांमध्ये हे खांब हटविण्याचे काम सुरु होईल. आणि लवकरच उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल.
– सुरेश आसूटकर, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग मारेगाव.
हे देखील वाचा:
विद्यार्थ्यांसाठी खुशखबर: आता वर्ग 3 ते 10 पर्यंतची इंग्रजीची ट्युशन फक्त 1 हजार रुपयात
Comments are closed.