मारेगावच्या ठाणेदारांची सहका-यांसह वेषांतर करत जुगार अड्ड्यावर धाड

कुंभा येथे मारेगाव पोलिसांची धाडसी कारवाई, अवैध व्यावसायिकांचे दणाणले धाबे...

भास्कर राऊत, मारेगाव: कुंभा येथील आठवडी बाजारामध्ये जुगारावर मारेगाव पोलीसांनी धाड टाकून चार जणांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाणेदार यांनी वेषांतर करत ही रेड टाकली. दोन दिवसातील तिसऱ्या धडक कारवाईमुळे तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील आठवडी बाजारात एका दुकानासमोर काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती नव्यानेच नियुक्त झालेले ठाणेदार राजेश पुरी यांना मिळाली. त्यावरून सापळा रचत आपला तालुक्यातील जनतेला परिचय नसल्याचा फायदा घेत सिव्हिल ड्रेसमध्ये एका मोटरसायकलवरून ठाणेदार राजेश पुरी हे आपल्या तीन सहकारी राजू टेकाम, अजय वाभीटकर व रजनीकांत पाटील यांच्यासमवेत कुंभा येथे गेले.

दुपारी दीड ये दोनच्या दरम्यान सरळ स्पॉटवर गेल्यानंतर त्यांनी सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकताच तिथे जुगार खेळत असलेल्यानी सैरावैरा पळायला सुरुवात केली. अशातच ठाणेदार व सहकाऱ्यांनी यांनी दोघांना अटक करण्यात आली. आणि यात तिघे जण पळून जाण्याचा यशस्वी झाले. घटनास्थळावरून बावन गंजीपत्ते आणि काही रोख रक्कम जप्त करण्यात आली. या पाचही जणांवर जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

अवैध व्यावसायिकांचे दणाणले धाबे
नुकतेच नव्याने रुजू झालेले ए. पी.आय. राजेश पुरी हे रुजू झाल्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारे कारवाया करीत आहेत. काल दि.17 ऑक्टोबरला अवैध दारू तसेच मटका पट्टीवर धड टाकण्यात आली होती. तसेच आज सलग दुसऱ्या दिवशी अवैध जुगारावर कारवाई करीत अवैध व्यावसायिकांच्या मनात धास्ती निर्माण केली आहे.

हे देखील वाचा:

गोडीगुलाबीने केली महिलेची शिकार, लग्नाचे नाव काढताच दिला नकार

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.