कोंबड्याच्या झुंजीवर हारजीत जुगार खेळताना 8 जणांना अटक

दुचाकी, मोबाईल व रोख रकमेसह 2 लाखाचा मुद्देमाल जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत पिंप्री (कायर) शिवारात जंगलात सुरु असलेल्या कोंबड बाजारावर शिरपूर पोलिसांनी धाड टाकून आठ जणांना अटक केली. शिरपूरचे ठाणेदार सपोनि गजानन करेवाडसह पोलीस पथकाने टाकलेल्या धाडीत जिवंत व मयत कोंबडे, मोटारसायकल, मोबाईल संच तसेच आरोपीचे अंगझडतीत रोख रक्कम असा एकुन 2 लाख 950 रुपये किमंतीचा मुददेमाल जप्त केला.

पिंपरी (कायर) गांवाजवळील स्मशानभुमी जवळील बाभळीचे जंगालात कोंबड्याची झुंझ लावुन त्यावर पैसे लावुन काही व्यक्ती हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीवरून रविवार 19 डिसेंम्बर रोजी सपोनि गजानन करेवाड, पीएसआय रामेश्वर कांडुरे यांनी पोलीस स्टॉफसह वेशांतर करून खाजगी वाहनाने दोन पंचा सह जावुन रेड केली. सदर ठीकाणी आठ व्यक्ती हे कोंबड्याच्या झुंझीवर पैसे लावुन हारजीतचा जुगार खेळताना आढळले. पोलीस पथकाने सर्व आरोपींना ताब्यात घेऊन वरील मुद्देमाल जप्त करून शिरपूर पोलीस ठाण्यात आणले.

पोलिसांनी अटक करण्यात आलेले जुगारी राकेश महादेव महाकुलकार (29), राजु पुरुषोत्तम पिंपळकार (39) दोन्ही रा.पठारपुर, हर्षल आनंदराव कळसकर (19), रा.सैदाबाद, बंडू शेषराव गेडाम (50) रा.पिंपरी, परसराम बळीराम ढेंगळे (58) रा.पुरड, विठठल मारोती गिरसावळे (40) रा.बाबापुर, सुधीर गजानन पाचभाई (36) रा.आडेगांव ता.झरी व देवानंद आनंद मोकासे (57) रा.साफल्य नगरी वणी या सर्व आरोपीवर महाराष्ट्र जुगार कायदा अनव्ये गुन्हा दाखल केले.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधीकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनात सपोनि गजानन करेवाड, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे, गंगाधर घोडाम, अभीजीत कोषटवार, प्रमोद जुनुनकर, सुनिल दुबे, अमोल कोवे, राजु ईसनकर, गजानन सावसाकडे, निलेश भुसे, विजय फुलके यांनी पार पाडली.

Comments are closed.