नंदिग्राम एक्सप्रेसच्या धडकेने युवक जागीच ठार

नांदेपेरा रेल्वे क्रॉसिंगजवळ आढळला छिन्नविछिन्न मृतदेह

विवेक तोटेवार, वणी: कोणाच्याही अंगाला थरकाप सुटावा अशी घटना गुरुवार दिनांक 17 जुलैला सकाळी 11.30 वाजण्याच्या दरम्यान घडली. मुंबईहून येणाऱ्या नंदिग्राम एक्सप्रेसने धडक दिल्याने तरुणाच्या मृतदेहाचे दोन तुकडे झालेत. प्रत्यक्षदर्शींच्या मते हा तरुण रेल्वे ट्रॅकवर लेटलेला होता. नंदीग्राम एक्सप्रेस तब्बल अर्धा तास उभी करण्यात आली. मृतदेह बाहेर काढल्यानंतर रेल्वे पुढे गेली. मृतक हा अंदाजे 35 वर्षाचा असून त्याच्या अंगावर पिवळा रंगाचा शर्ट व काळा रंगाचा बरमुडा आहे.

मृतक युवकाची ओळख अद्याप पटली नसून रेल्वे पोलिस घटनास्थळी पोहचले.वणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू असून, स्थानिकांमध्ये या दुर्घटनेमुळे खळबळ उडाली आहे.आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (अपडेट- मृतकाचे नाव शिव बालक पटेल (28) रा. सोनवर्षा रीवा मध्यप्रदेश असे असून तो एका बार मध्ये काम करीत होता)

Comments are closed.