पोलीस राजेंद्र कुळमेथेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जखमी पोलिसांवर सुगम रुग्णालयात उपचार सुरु

0

विलास ताजने, वणी: मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील अनिल मेश्राम वय ३५ हा एका गुन्ह्यात आरोपी आहे. सदर आरोपी विरुद्ध अटक वारंट घेऊन त्याला ताब्यात घेण्यासाठी मारेगाव पोलीस आज दि.२६ सोमवारी रात्री उशिरा आरोपीच्या घरी गेले होते. मात्र आरोपीने उलट पोलिसांवर हल्ला केला. यात जमादार राजेंद्र कुळमेथे यांचा मृत्यू झाला. तर जमादार मधुकर मुके, पोलीस शिपाई प्रमोद फुफरे हे जखमी झाले होते.

आज सांयकाळी पाच वाजता वणी येथे शासकीय इतमामात मृतक राजेंद्र कुळमेथे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वणी, मारेगाव येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होता. जखमींवर सुगम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. मृतक राजेंद्र यांच्यामागे पत्नी माया, मुलगा पंकज असा परिवार आहे. त्यांची पत्नी राजूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

राजेंद्र कुळमेथेचे मुळगाव चंद्रपूर जिल्ह्यातील घोसरी आहे. आरोपी विरुद्ध कायमी कलम ३०२, ३२४, ३३२, ३३३, ३५३,३४ भा.दं.वि. नुसार गुन्हे दाखल केले आहे. आरोपी फरार असून पोलीस शोध घेत आहे. घटनास्थळाला अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांनी भेट दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.