जब्बार चीनी, वणी: हनुमाननगर, वामनघाट रोड स्थित रमेश अणे यांचे आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 78 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, मुलगी नातवंड असा आप्तपरिवार आहे.
लोकमान्य टिळक महाविद्यालयातील इंग्रजीचे प्राध्यापक डॉ. अभिजित अणे यांचे ते वडील होते. काही दिवसांपासून ते आजारी होते. आज सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांचा जनसंपर्क अत्यंत दांडगा होता. ते मृदुभाषी होते. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा