श्री रंगनाथ स्वामी यात्रा महोत्सवात रंगली भजनसंध्या
गिरीश कुबडे, वणीः शहरातील प्रसिद्ध श्री रंगनाथ स्वामी यात्रा महोत्सवाला आरंभ झाला आहे. या यात्रा महोत्सवानिमित्त नियमित विविध कार्यक्रमांचे आयोजन देवस्थानाद्वारे करण्यात आले. या अंतर्गत भजनसंध्या झाली. श्री स्वामी समर्थ संगीत संचाचे शैलेश आडपावार ह्यांनी ही भजनसंध्या प्रस्तुत केली. विदर्भातील ख्यातनाम कवी, लेखक सुनील इंदुवामन ठाकरे अभ्यासपूर्ण निवेदनाने या भक्तिसंगीत मैफलीला बहर आला. सहगायन जगदीश ठावरी, गणपतराव आडपावार व संजय शिरभाते यांनी केले. शहरातील अनुभवी व ज्येष्ठ कलावंत नामदेवराव ससाणे ह्यांनी संवादिनीची, अमोल बावणे यांनी ढोलकीची, स्वप्निल नांदेकर यांनी तबल्याची साथ केली.
पारंपरिक व काही जुन्या, नवीन भक्तिगीतांनी उपस्थितांची मने जिंकलीत. सुख के सब साथी, साहीर लुधिनायनवी यांचं हे रोम रोम मे बसने वाले राम, साईनाथ तेरे हजारो हाथ, अंकुश चित्रपटातील इतनी शक्ती हमे देना दाता, अष्टविनायक चित्रपटातील प्रथम तुला वंदितो, जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारं गीत कभी प्यासे को पानी पिलाया नही, बाद अमृत पिलाने से क्या फायदा, जगजितसिंग ह्यांचं अंबे चरण कमल है तेरे, बडी देर भई नंदलाला अशा अनेक दर्जेदार भक्तिगीतांनी मैफलीत रंग भरलेत. मैफलीचे निवेदन सुनील इंदुवामन ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन सतीश बावीसकर ह्यांनी केले.