12 वर्षीय मुलीवर अत्याचार, उमरघाट येथील घटना

31 वर्षीय आरोपीस अटक....

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील उमरघाट येथे एका 12 वर्षीय मुलीवर एका 31 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनिल नारायण टेकाम (31) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी दिनांक 23 ऑगस्ट रोजी घडली.

Podar School 2025

सकाळच्या सुमारास पीडित मुलीचे आईवडील शेतात गेले होते. दुपारच्या सुमारास पीडित मुलगी एकटीच खाटेवर झोपून होती. याचा फायदा घेत आरोपी अनिल घरात शिरला व त्याने मुलीवर अत्याचार केला. दरम्यान पीडितते स्वत:ची सुटका करण्यासाठी आरडा ओरड केली मात्र आरोपीने मुलीचे तोंड व गळा दाबून धरला, पीडिताने आरोपीच्या हातावर आघात केला असता आरोपी तिथून पसार झाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या प्रकारानंतर पीडिता रडत रडत घराबाहेर आली. तिने शेजा-यांना याबाबत माहिती दिली. दरम्यान पीडितेचे आई वडील शेतातून आले. मुलीने घडलेली सर्व आपबिती सांगितली. त्यांनी रात्रीच या घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. रात्री मारेगावला जाण्यासाठी ऑटो नसल्याने आज सोमवारी दिनांक 24 ऑगस्ट रोजी पीडिता व तिच्या आईवडिलांनी मारेगाव पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली.

मारेगाव पोलिसांनी कुठलाही विलंब न करता आरोपी अनिल नारायण टेकाम यांचे विरोधात कलम 354, 354 (अ), 452 भांदवी सह कलम 8 लैंगिक अत्याचार अंनव्ये गुन्हा दाखल केला व आरोपीस तात्काळ अटक केली. पुढील तपास पो.नि. जगदीश मंडलवार, पो.उप.नि. अमोल चौधरी यांचे मार्गदर्शनात मारेगाव पोलीस करत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.