गुरुनगर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मैत्री करून आरोपीने केला मुलीवर अत्याचार

जितेंद्र कोठारी, वणी: एका अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला घरी बोलावून अत्याचार केल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. शहरातील गुरुनगर येथे ही घटना घडली. विक्की किशोर पटूना असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की पीडित मुलगी ही भद्रावती येथे 10 व्या वर्गात शिक्षण घेते. सध्या ऑनलाईन क्लास सुरू असल्याने ती वणीला घरी परत आली होती. आरोपी विक्की किशोर पटूना (20) हा गुरुनगर येथील रहिवाशी आहे. शहरातील एका कार्यक्रमात पीडिता हि तिच्या कुटुंबीयांसह गेली होती. तिथे तिची आरोपीशी ओळख झाली. त्यांच्यात मैत्री झाली. दरम्यान त्याच्यात संभाषण देखील व्हायचे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

5 ऑगस्ट 2021 रोजी आरोपीने पीडितेला त्याच्या गुरुनगर येथील घरी बोलावले. त्यांच्यात मैत्री असल्याने बालिका देखील दुपारी 1 वाजताच्या सुमारास त्याच्या घरी गेली. मात्र तिथे आरोपीच्या मनात वेगळेच काही शिजत होते. त्याने मुलीला प्रपोज करत तिच्यावर अत्याचार केला.

या प्रकाराने मुलगी हादरली. मात्र तिने याबाबत कुणाला काही सांगितले नाही. काही दिवसांनी तिच्या पोटात दुखायला सुरूवात झाली. त्यावर आईने विश्वासात घेऊन विचारणा केली असता मुलीने आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला.

मुलीच्या वडिलांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी विक्की किशोर पटूना याच्या विरोधात भादंविच्या कलम 376(3) व बाल संरक्षण कायदा (पोस्को) कायद्याच्या कमल 4, 6 नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तात्काळ आरोपी विक्कीला अटक केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शात सुरू आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.