भूलथापा देऊन अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, मुलगी गर्भवती…

मारेगाव तालुक्यातील घटना, आरोपी मजनूला अटक... विविध कलमांन्वये गुन्हा दाखल

भास्कर राऊत, मारेगाव: एका अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करत तिला गर्भवती करणा-या मजनूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमारिका ही 4 महिन्याची गर्भवरती असून अत्याचार करणाऱ्या आरोपीविरुद्ध मारेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेगाव तालुक्यात ही घटना घडली आहे.

16 वर्षीय कुमारिका ही तालुक्यातील एका गावातील रहिवाशी आहे. ती तालुक्यातीलच एका कॉलेजमध्ये 11 व्या वर्गात शिकते. तिचे श्रीरामपूर येथील राजकुमार रामभाऊ मेश्राम वय 23 याच्याशी ओळख होती. 2 वर्षांआधी त्यांचे सुत जुळले. दिवसेंदिवस त्यांचे प्रेम बहरत गेले. हळूहळू गाठीभेटी वाढल्या आणि येथूनच त्यांच्या पुढील प्रवासास सुरुवात झाली.

एके दिवशी आरोपी राजकुमारने मुलीला गावालगतच्या शेतात नेले. तिथे नेऊन त्याने काहीही होत नाही, तू काळजी करू नकोस, असे सांगत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो दरवेळी आपण लवकरच लग्न करू अशा भुलथापा मारत तिच्यावर शेतात जाऊन अत्याचार करत होता. दरम्यान जुलै महिन्यात मुलगी गर्भवती झाली. मात्र ही गोष्ट मुलीच्या आईच्या नजरेतून सुटली नाही. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

 मुलीच्या आईने विश्वासात घेऊन विचारणा केली असता मुलीने ती गर्भवती असल्याचे सांगितले. हे कळल्यावर तिचे कुटुंब हादरून गेले. तिच्या कुटुंबीयांना काय करावे हे कळत नव्हते. समाजात आपली बदनामी होईल म्हणून सर्व शांत बसले. असाच काही काळ लोटला. गर्भ वाढत गेला. शेवटी कुटुंबियांनी हिंमत करीत मारेगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

आरोपी राजकुमार मेश्राम विरोधात भादंविच्या कलम 376, 376 (1) ए, 376 (2) जे, (एन) सहकलम 4, 6 पोक्सो (बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

Comments are closed.