बहुगुणी डेस्क, वणी: एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या कुमारिकेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी प्रियकरावर विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉलेज तरुण ही सज्ञान नसून दवाखान्यात तपासणीसाठी गेल्यावर ती चार महिन्याची गर्भवती असल्याची माहिती मिळाल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला. मारेगाव पोलिसांनी आरोपी प्रियकराच्या मुसक्या आवळल्या आहे.
सविस्तर वृत्त असे की पीडित मुलगी ही 17 वर्षांची असून ती एका कॉलेजमध्ये शिक्षण घेते. तर आरोपी संजय विलास जुमनाके (22) हा टाकरखेडा येथील रहिवासी आहे. या दोघांची ओळख आहे. मुलीचे आईवडील शेतात गेले की आरोपी मुलीच्या घरी यायचा. त्यातून दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. मुलीच्या अज्ञानतेचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केला.
दरम्यान मुलीच्या पोटात दुखू लागले. घरच्यांनी याबाबत तिला विचारणा केली असता तिने पोटात गाठ आल्याचे कारण सांगितले. मात्र पोटात वारंवार दुखथ असल्याने तिच्या पालकांनी तिला चंद्रपूर येथील एका दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना ती 4 महिन्याची गर्भवती असल्याचे कळले. त्यांनी ही बाब मुलीच्या पालकांना सांगितले. त्यांनी विश्वासात घेऊन मुलीला याबाबत विचारणा केली असता मुलीने सर्व हकिकत सांगितली. शिवाय प्रियकराला ही बाब माहिती असून कुणाला सांगितल्या जीवे मारील अशी धमकी दिल्याचेही पीडितेने सांगितले.
मुलीने तिच्या पालकांसह मारेगाव पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी संजय विलास जुमनाके विरोधात भादंविच्या कलम 376 (2)(F)(N), 506 व पोक्सोच्या कलम 3अ, 4, 5 अशा कलमांतर्गत दाखल केला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.