साईनगरीत रस्त्याचे रूपांतर झाले तलावात
सांडपाणी साचल्याने आरोग्य धोक्यात, कुठे गेलेत लोकप्रतिनिधी?
विवेक तोटेवार, वणी: शहरातील ब्राह्मणी रोडवर स्थित साईनगरीत पावसाळ्यात शहरातून येणाऱ्या मोठया नाल्याचे घाण पाणी साचत असते. याचा कॉलनीतील जनतेला नाहकच त्रास सहन करावा लागतो. या कॉलनीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी साईनगरीवासीयांनी निवेदनातून केली आहे. याबाबत त्यांनी आमदारांना निवेदन सादर केले आहे.
साईनगरी कॉलनीत गेल्या अनेक वर्षांपासून मंजूर बगीचाचे बांधकाम झाले नाही. नगरीतील अंतर्गत रस्त्याची चाळणी झाली आहे. शहरातून मोठया नाल्यातून येणारे घाण पाणी याच ठिकाणी साचल्याने कॉलनीतील लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शिवाय पिण्याचे पाणीही मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
कॉलनीतील सांडपाणी जाण्याची व्यवस्था नाही. अशा अनेक समस्यांना साईनगरीतील जनतेला समोर जावे लागत आहे. या समस्यांकडे लोकप्रतिनिधीनी लक्ष देण्याची मागणी आता जोर धरत आहे. कॉलनीत रस्त्यावर तलाव साचले आहेत. ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. नगर पालिकेचे सफाई कामगारही याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप साईनगरी वासीयांनी निवेदनातून केला आहे. याबाबतचे निवेदन आमदारांनाही देण्यात आले आहे.
हे देखील वाचा: