जितेंद्र कोठारी, वणी: वणी उपविभागात दरवर्षी रस्ते अपघातात शेकडो लोकांना आपले जीव गमवावे लागतात. अपघात नियंत्रण उपाययोजना करण्यासाठी वणी वाहतूक नियंत्रण शाखातर्फे मागील एका वर्षात घडलेल्या रस्ते अपघाताबाबत घटनस्थळ सर्वेक्षण करण्यात आले. मागील 3 महिन्यात वाहतूक अधिकार्यानी वणी, मारेगाव, शिरपुर, मुकुटबन व पाटण पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या अपघातस्थळावर भेट देऊन तब्बल 77 ‘ब्लेक स्पॉट’ चिंहित केले आहे.
वणी वाहतूक शाखेचे नियंत्रक सपोनि मुकुंद कवाडे यांनी वणी उपविभागात रस्ते अपघात बाबत कारण जाणून घेण्यासाठी स्टाफसह घटनास्थळ चौकशी केली. त्यात वणी पोलिस स्टेशन हद्दीत 22 शिरूपूर-20, मारेगाव-20, मुकुटबन-12 आणि पाटण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या 3 ठिकाण हे ‘ब्लेक स्पॉट’ म्हणून निश्चित करण्यात आले.
या ठिकाणी अपघात घडणेसाठी रस्त्यांची खराब परिस्थिति, रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाढलेले झाडे व गवत, रस्त्याच्या दर्शनीय ठिकाणी वाहतूक चिन्हे नसणे, धोकादायक वळणावर साइनबोर्ड नसणे तसेच विविध ठिकाणी गती सीमा नियंत्रण फलक नसल्याचे प्रमुख कारण समोर आले.
वाहतूक विभागाने चिंहित केलेले सर्व 77 ‘ब्लॅक स्पॉट’ बाबत सविस्तर अहवाल तयार करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविले आहे. वाहतूक नियंत्रण शाखेच्या सूचनेवरून बांधकाम विभागाने वणी घुग्गुस चंद्रपूर महामार्गावर 10 ठिकाणी तातडीने रस्ता दुरूस्तीचे काम पूर्ण केले आहे.
दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा
दुचाकी अपघातता चालक किंवा मागे बसलेल्या व्यक्तीच्या डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याचे प्रमाण अधिक आहे. मोटरसायकल चालविताना नेहमी हेलमेटचा वापर करावा. वाहन मर्यादित वेगाने चालवावे. वळणावर आपल्या वाहनाचे वेग कमी करावे. मद्यपान करून वाहन चालविणे कायद्याने गुन्हा आहे.
मुकुंद कवाडे, स.पो.नि. वाहतूक नियंत्रण शाखा वणी
हे देखील वाचा –
Comments are closed.