वाहतूक विभागाकडून 33 लाख 62 हजारांचा दंड वसूल

वाहतुकीचे नियम भंग करणा-यांवर पोलिसाची कारवाई

जितेंद्र कोठारी, वणी: अपघातांमध्ये घट येण्यासाठी तसेच वाहतूकीमध्ये शिस्त येण्यासाठी चालकांनी मोटार वाहन कायद्याचे नियम पाळणे आवश्यक आहे. तरीही वारंवार वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. या कायद्याची परिणामकारकता साधण्यासाठी नियम तोडणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. यात वणी उपविभागात मागील 5 महिन्यात बेशिस्त वाहन चालकांकडून तसेच वाहतुकीचे नियम भंग करणा-यांकडून 33 लाख 62 हजार 500 रुपये दंड वसूल केला आहे.

Podar School 2025

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांचे मार्गदर्शनात वाहतूक शाखेचे सपोनि संजय आत्राम व वाहतूक कर्मचाऱ्यांनी मागील 5 महिन्यात मोटार वाहन कायद्या अंतर्गत 7888 केसेस केल्यात.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यात 7733 तडजोड प्रकरणात 32 लाख 27 हजार 500 रुपये दंड वसूल झाला. अवैध प्रवासी वाहतूक व ड्रंक अँड ड्राइव्ह अंतर्गत न्यायालयात दाखल करण्यात 155 केसेसमध्ये 1 लाख 35 हजाराचा दंड आकारण्यात आले. अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.

शहरातून होणारी अवजड वाहतूक बंद
घुग्गुस वणी मार्गावर टोल टॅक्स वाचविण्यासाठी हलके व्यावसायिक वाहनांसोबतच कोळसा आणि सिमेंट वाहतूक करणारे अवजड वाहनाचे शहरातून मार्गक्रमण वाढले होते. यावर उपाय म्हणून वाहतूक विभागाने लालगुडा चौपाटीकडून शहरात येणाऱ्या मार्गावर जंगलीपीर दर्ग्याजवळ बॅरिकेट्स उभे करून जड वाहतूक बंद केली आहे.

शहरातील अंतर्गत वाहतूक विस्कळीत
बेशिस्त वाहनधारकांकडून लाखो रुपये दंड वसूल करण्याची कामगिरी वाहतूक उपशाखेने केली आहे. मात्र शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे आरोप वाहतूक पोलिसांवर होत आहे. गांधी चौक, तिलक चौक, बस स्थानक परिसर, साई मंदिर चौक येथे रस्त्यावर अतिक्रमण व प्रवासी ऑटोमुळे वाहतूक कोंडी होत आहे. तर वरोरा रोड, नांदेपेरा मार्ग व चिखलगाव रेल्वे फाटकवर दिवस भरात अनेकदा ट्रॅफिक जाम होत असताना एकही वाहतूक कर्मचारी उपस्थित राहत नाही. 

हे देखील वाचा:

Comments are closed.