ग्रामपंचायत ढाकोरीतर्फे RTPCR टेस्ट कॅम्प

कोरोनाबाबत खबरदारी म्हणून कॅम्पचे आयोजन

0

विवेक पिदुरकर, शिरपूर: कोलगाव आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या ढाकोरी येथे सरपंच अजय कवरासे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थाची आरोग्याची गरज लक्षात घेता आर. टी. पी. सी. आर. कॅम्प घेतला. याचा लाभ ग्रामस्थांनी घेतला. यावेळी 176 लोकांनी तपासणी केली. त्यात RTPCR 100 आणि अँटीजन 76 टेस्ट झाल्यात.

शनिवार दि. ८ मे रोजी दुपारी जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्व कोरोना प्रोटोकॉलचे नियम पाळीत आरोग्य शिबिर झाले. ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अजय कवरासे हे होते. तर ग्रामसेवक पवार, ग्रा. प कर्मचारी महेंद्र काकडे, आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक अलसावार, आशा सेविका मडावी, पोलीस पाटील प्रभाकर कोहळे यावेळी उपस्थित होते.

यावेळी आरोग्य अधिकारी यांनी ग्रांम पंचायतीच्या मदतीने सर्व ग्रामस्थांची आरटीपीसीआर तपासणी करून कोविड ह्या साथीच्या रोगापासून बच्चाव करताना आरोग्याची काळजी कशी घेतली पायजे यावर मार्गदर्शन केले. या तपासणी वेळी 176 लोकांनी तपासणी केली. त्यात RTPCR 100 आणि अँटीजन 76 टेस्ट झाल्यात.

यात ढाकोरी गावातील 2, निंबाळा 1, गोवारी 1, कुरई 1 येथील कोविड लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचारासाठी आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार कोविड सेंटर येथे भरती केली. तर सरपंच अजय कवरासे यांनी साथीचा रोग असला तरी गावकऱ्याची एकता ही रुग्णांना बरे करण्याचा मोठा आधारवड असल्याचं म्हटलं.

ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ग्रामपंचायत सदस्य व कोरोना नियोजन समिती, अमर जोगी, शामसुंदर खाडे, बंडू हनुमंते, सौरव कवरासे, दिवाकर काळे, पंकज मांडवकर यांनी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा:

निर्धारित वेळे व्यतिरिक्त दुकाने सुरू राहिल्यास 50 हजारांचा दंड

वणी-मुकुटबन मार्गावर 18 नंबर रेल्वे पुलाजवळ अपघात

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.