सुशील ओझा,झरी: तालुक्यातील मांडवी येथील रेती घाटावर अवैधरीत्या उपसा करून वाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्टरला महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारच्या रात्री पकडून पाटण पोलीस स्टेशनला लावले. ट्रॅक्टर पकडताच चालक व मालक पळून जाण्यात यशस्वी झाले. ट्रॅक्टर मध्ये 1 ब्रास रेती व ट्रॅक्टर जप्त करून ठाण्यात लावण्यात आले. 1 ब्रास रेती अवैधरीत्या उपसा करून वाहतूक केल्याप्रकरणी ट्रॅक्टर मालकावर 1 लाख 11 हजाराचा दंड ठोठवण्यात आला
.
मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अडेगाव शिवारात 17 मेच्या रात्री 2 वाजताच्या दरम्यान एक ट्रॅक्टर अवैधरीत्या रेतीची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. यावरून मंडळ अधिकारी एल. यु. चांदेकर व तलाठी संजय थुल यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. ट्रॅक्टर मुकुटबन ठाण्यात लावण्यात आला. चालक दिनेश काशीनाथ जीवतोडे रा अडेगाव याला विचारणा विचारणा केली. सदर ट्रॅक्टर मालक कायर येथील रमेश महादेव लेनगुळे यांचे असल्याचे सांगितले.
ट्रॅक्टरमध्ये 1 ब्रास रेती व ट्रॅक्टर ( MH29,VP 2617) जप्त करून पंचनामा करून मुकुटबन ठाण्यात लावण्यात आले. सदर ट्रॅक्टरवर 1 लाख 17 हजार रुपये दंड लागणार असल्याची माहिती मिळत आहे. कारण दंडाकरिता सुनावणी ठेवण्यात येणार असून त्यात दंड ठोठावणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी वाढली आहे. पैनगंगा नदीच्या पात्रातून तसेच पठारपूर नाल्यातून चिलई, तेजापूर, खातेरा, मुंजाळा नदीघाटावरून व नाल्यातील रेती वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मुकुटबन, पिंपरड, मांगली, साखरा, बोपापूर, शिंदी वाढोना, कोसारा, सतपेलली, मांडवी, झरी, जामनी, कोसारा, नेरड येथील रेतीचोरटे असल्याची चर्चा आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
प्रियकराच्या प्रेमाला आला चांगलाच बहर, प्रेयसी गर्भवती होताच केले हात वर
हेदेखील वाचा