सुदर्शन निमकर यांचा झंझावात, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

शुक्रवारी कोरपना तालुक्यातून जनसंपर्क दौ-यांना सुरूवात

0

राजुरा: माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन निमकर यांच्या जनसंपर्क दौ-यांना शुक्रवारी दिनांक 26 जुलै रोजी सुरूवात झाली. कोरपना तालुक्यातून त्यांनी या प्रचार दौ-याला सुरूवात केली. गाव खेड्यातील कार्यकर्त्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच विधानसभेच्या तयारीला लागण्याचा त्यांना आदेश देण्यात आला.  या दौ-यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विधानसभेची निवडणूक आता काही दिवसांवर ठेपली आहे. त्यानिमित्त सुदर्शन निमकर यांनी आतापासून जनसंपर्क दौ-याला सुरुवात केली आहे. त्यांनी कोरपना, कान्हाळगाव, खैरगाव, बोरगाव (बु), बोरगाव (खु) येरगवान, कटलाबोडी, वंसाडी, सोनुर्ली इ गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी कार्यकत्यांच्या भेटी घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी केशव ठाकरे गुरूजी, कोरपना तालुका युथ अध्यक्ष अमोल आसेकर, मोहितकर गुरूजी, विठ्ठल पिंपळकर, नथ्थू पाटील लोडे, धनराज जिवने, गुलाब किनाके, गोविंद अहिरकर, उत्तम आत्राम, पुंडलीक रासेकर, रमेश हरबडे, रामचंद्र बलकी, मारोती भोंगळे, नागोबा देवाळकर, गुलाब जिवतोडे, श्याम पाटील सलाम, राजू सलाम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.