संजय देरकर यांची जनसंपर्क मोहीम सुरू
गावात भेटी देऊन लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न
ज्योतिबा पोटे, मारेगाव: मोफत वीज अभियानाच्या स्वाक्षरी अभियानाच्या यशस्वी आयोजनानंतर संजय देरकर यांनी परिसरात जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान ते कार्यकर्त्यांसोबत विविध गावात जाऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत आहे. त्यांच्या हा मोहिमेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून ग्रामस्थ त्यांच्याजवळ गावातील विविध समस्येबाबत माहिती देत आहेत.
जनसंपर्क मोहिमे अंतर्गत त्यांनी मारेगाव तालुक्याला भेट दिली. यात त्यांनी मारेगाव तसेच परिसरातील खेड्यांना भेटी दिल्या. शुक्रवारी त्यांनी मारेगाव येथे जाऊन तिथे लोकांच्या भेटी घेतल्या तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी परिसरातील खेड्यांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून समस्येचे निराकरण करण्याबाबत सूचना दिल्या.
गेल्या महिन्यात संजय देरकर यांनी मोफत विजेसाठी स्वाक्षरी अभियान राबवले होते. या अभियाना दरम्यान संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यात आला असून याद्वारे मोफत विजेसाठी खेड्यापाड्यातील लोकांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्या. त्यानंतर आता संजय देरकर यांनी जनसंपर्क मोहिमेचा धडाका लावला आहे. या वेळी लव्हाळे सर, जितू नगराळे, अमर पिंपळकर, गजू दुर्गे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.