संताजी ज्ञान प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी रमेश येरणे तर सचिवपदी धनंजय आंबटकर

विवेक तोटेवार, वणी: शहरातील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संताजी ज्ञान प्रसारक मंडळाची 29 एप्रिल रोजी आमसभा झाली. या आमसभेत नवीन संचालक मंडळाची सर्वानुमते निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी रमेश येरणे तर सचिव पदी धनंजय आंबटकर यांची निवड करण्यात आली. संताजी ज्ञान प्रसारक मंडळ ही संस्था गेल्या 35 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे.

Podar School 2025

मागील 5 वर्षांपूर्वी 18 फेब्रुवारी 2018 रोजी संस्थेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली होती. त्यानंतर आता 29 एप्रिल रोजी आमसभा झाली. यातूनच पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये सर्वानुमते अध्यक्ष म्हणून रमेश येरणे, उपाध्यक्ष ओमप्रकाश निमकर, सचिव धनंजय आंबटकर तर सहसचिव म्हणून तान्हाजी पाऊनकर यांची निवड करण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

नवीन कार्यकरिणीमध्ये दोन सदस्य नवीन घेण्यात आले आहे. नवीन सदस्यांनाही कार्यकारिणीत काम करण्याची संधी मिळावी या उद्देशाने दोन सदस्यांना संधी देणअयात आली आहे. नवीन कार्यकारिणीत संजय पोटदुखे, दिलीप पडोळे, मंगेश येनूरकर, विलास क्षीरसागर, शोभा गंधारे, विवेक बुटले, खुशाल कतोरे या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते पुढील 5 वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.

हे देखील वाचा: 

Comments are closed.