जितेंद्र कोठारी, वणी: कोरोनाच्या संकटात जीवावर उदार होऊन लोकांचे संरक्षण करणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे गुरुवार दि. 22 ऑक्टोबर रोजी जैताई देवस्थान समितीतर्फे सत्कार करण्यात आलेत. नवरात्रौत्सवादरम्यान जैताई मंदिर समितीकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत.
वणी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना प्रभावीपणे कोरोना नियंत्रण उपाययोजना राबवून या अधिकाऱ्यांनी कोरोनावर बरंच नियंत्रण मिळविले. या अनुषंगाने वणी येथील उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार शाम धनमने व ठाणेदार वैभव जाधव यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व देवीचा प्रसाद देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
कोरोना काळात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या या अधिकाऱ्यांचे मंदिर समिती तर्फे बाळासाहेब सरपटवार यांनी आभार मानले. तर अधिकाऱ्यांनीसुद्दा या संकटात वणीकर जनतेनी साथ दिल्याबद्दल सर्व जनतेप्रती आभार व्यक्त केले.
यावेळी जैताई मंदिर समितीचे बाळासाहेब सरपटवार, नरेंद्र नगरवाला, मुन्ना पोतदार, दिवाण फेरवानी, मुन्नालाल तुगनायत, किशोर साठे, मयूर गोयनका, नामदेव पारखी व इतर सदस्य उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)