विवेक पिदूरकर, शिरपूर: सावंगी (नायगाव) येथे सभामंडप आणि तलाठी निवासाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, सदर बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे सदर बांधकामाची चौकशी करण्याची मागणी सरपंच शालू ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वणी तालुक्यातील सावंगी येथे ग्रामीण विकास कार्यक्रम अंतर्गत सभामंडप आणि तलाठी निवासाचे बांधकाम सुरू आहे. परंतु या बांधकामासाठी ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाच्या विटा आणि अन्य साहित्य वापरल्या जात आहे. त्यामुळे बांधकामाचा दर्जा खालावलेला आहे.
म्हणून सदर निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी करण्यात यावी. तसेच सदर बांधकामाची देयके देण्यात येऊ नये, अशी मागणी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग वणी आणि आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याकडे केली आहे.
हे देखील वाचा: